फसवणुकीवर “शिक्कामोर्तब” : पोलिसांचे बांधलेले हात न्यायालय सोडवणार?
कोल्हापूर : अक्षय पाटील
दैनिक पुढारीचे तत्कालीन वार्ताहर शरद काळे यांना खोट्या गुन्ह्यात अडकवून त्यांना तुरुंगात पाठवण्याचे मनसुबे पांढऱ्या कपड्यात वावरणाऱ्या काळ्या बोक्याने रचले होते. त्यासाठी शासकीय दस्ताऐवजात खाडाखोड करण्यापर्यंत मजल काळा बोका व त्याच्या सहकाऱ्यांनी गाठली होती. ही बनावटगिरी शरद काळे यांनी उघडकीस आणून बनावट गुन्ह्याचा कट रचणाऱ्यांना कोर्टात खेचले आहे. फिर्यादी शिवाप्पा कुंभार यानेच गुन्हा दाखल करण्यासाठी खोटी कागदपत्रे पोलिसांना दिल्याचा स्पष्ट अहवाल पोलिसांनीच न्यायालयात सादर केला आहे. पोलिसांची फसवणूक झाली असताना संबंधितावर गुन्हा दाखल करण्यासाठी पोलिसांचेच हात धजावण्यास तयार नाहीत.. त्यामुळे पोलिसांचे बांधलेले हात आता न्यायालय सोडवणार का? याकडे लक्ष लागले आहे.
दैनिक पुढारीचे अकाउंट मॅनेजर व फिर्यादी शिवाप्पा हणमंत कुंभार यांनी, दिलेल्या “तक्रारी अर्जावरुन व सादर केलेल्या कागदपत्रा वरून” गुन्हा दाखल आहे, असा स्पष्ट उल्लेख पोलिसांनी आपल्या अहवालात केला आहे. पोलीस अधीक्षक यांच्याकडे दिलेल्या तक्रार अर्जावर जाहिरात व्यवस्थापक (ग्रामीण) जाहीदहुसेन शेख याचीही स्वाक्षरी आहे. या प्रकरणात बातमीदारीच्या माध्यमातून वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यांशी असलेल्या संबंधाचा (दिलीप नामक) गैरवापर केल्याचा संशय आहे, त्याच्याही भुमिकेची चौकशी करून त्यांना आरोपी करण्याची मागणी न्यायालयाला करणार असल्याचे शरद काळे यांनी बोलून दाखवले.
कुंभार व शेख या दोघांनी संगणमताने अन्य पाच साथीदारांच्या मदतीने शासकीय कागदपत्रात खाडाखोड करण्याचा गंभीर गुन्हा केल्याचे तसेच लक्ष्मीपुरी पोलिसांची फसवणूक केल्याचे प्रकरण पोलिसांच्या अहवालातून न्यायालयासमोर आले आहे.
बनावट व्हाउचर प्रकरणी शरद काळे यांनी पुढारीचे संपादक प्रतापसिंह जाधव, व्यवस्थापकीय संपादक योगेश जाधव, ग्रुप जनरल मॅनेजर अनिल पाटील, अकाउंट मॅनेजर शिवाप्पा कुंभार, ग्रामीण जाहिरात मॅनेजर जाहीदहुसेन शेख आणि वसुली प्रतिनिधी सागर कोळी यांच्याविरुद्ध यापूर्वी कोल्हापूर न्यायालयात फिर्याद दिली आहे. फिर्याद आणि पोलिसांच्या अहवालानुसार दि. 28 जानेवारी रोजी बनावटगिरी प्रकरणी कोल्हापूर न्यायालय कोणता निर्णय घेणार याकडे संपूर्ण महाराष्ट्राचे लक्ष लागले आहे.
पोलिसांनी दिलेल्या अहवालात फिर्यादी शिवाप्पा हणमंत कुभार याने दि.19 जून 2023 रोजी मा.पोलीस अधीक्षक यांचेकडे गुन्हा दाखल करणे करीता तक्रारी अर्ज सादर केला होता. सदर अर्जा सोबत कागदपत्रे सादर केली असून त्यामध्ये पावती खाली जाहिरात बिल स्वीकारणा-याची सही असून तहसिलदार शिरोळ यांची सही दिसत नाही, असे पोलिसांनी न्यायालयाला सादर केलेल्या अहवालात नमुद केले आहे.
मोठ्या शिक्षेची तरतुद
या अहवालावरून लक्ष्मीपुरी पोलिसांना, या गुन्ह्यात बनावट कागदपत्रे फिर्यादी शिवाप्पा कुंभार यांनी दिली आहेत. असा पोलिसांचा अहवाल सांगतो. पोलिसांना खोटी माहिती देणे हा भारतीय दंड संहिता कलम 182 अंतर्गत ( सहा महिन्यापर्यंत कारावास), खोटे पुरावे तयार करणे खोटा जबाब देणे हा कलम 191 व 192 अंतर्गत (तीन ते सात वर्ष कारावास), बनावट कागदपत्रे तयार करणे हा कलम 463 अंतर्गत (दोन वर्षापर्यंत कारावास) व खोटा गुन्हा दाखल करणे हा कलम 211अंतर्गत (दोन ते सात वर्षापर्यंत कारावास ) गंभीर गुन्हा आहे.
लवकरच आपल्या सेवेसाठी येत आहेत खळबळ माजवणाऱ्या बातम्या
डॉ. मोदी हॉस्पिटल, ट्रस्टची “जागा हडप” प्रकरण मुंबई (खंडपीठ कोल्हापूर) उच्च न्यायालयात.