गणेशवाडीच्या पाठबळाचा फायदा उठवत “असूूर”बाळासो” नामकाने “माण” मिळवत अनेक “गावे” गिळंकृत केल्याची चर्चा !
पोलिसांनी, खाजगी सावकारी, उंबरठ्याच्या आतील इज्जतीचा छळ, उपभोग्या पेशा, दहशत अशा जुलमी कार्यपध्दतीचा “बिमोड” करण्याची मागणी.
हसुर/शिरोळ : खमक्या वृत्तसेवा
शिरोळ शहराच्या “पूर्व” दिशेला “कृष्णा” नदीकाठच्या एका शेवटच्या गावात “ब्लॅक डायमंड” म्हणून पड नावाने ओळखला जाणाऱ्या एका “असुर”बाळासो” नामकाने एका “पतपेढी”च्या पाठबळावर वसूल अधिकारी म्हणून काम करीत, खाजगी सावकारीच्या माध्यमातून व्याजाने पैसा वाटून 40 हून अधिक दुर्बल अबलांचे शोषण केल्याची चर्चा आहे. संबंधित “असूर”बाळासो” नामकाची गोपनीय चौकशी सुरू असल्याचे समजते. पण याला दुजोरा मिळत नाही.
“असूर”बाळासो” नामकाने “मान” मिळवण्यासाठी गणेशवाडी, कनवाड, कुटवाड, हसूर, शिरटी, घालवाड, अर्जुनवाड अशी “गावे” पिंजून काढून सावज टिपून त्या कुटुंबांचा आर्थिक आणि उंबरठ्याच्या आतील इज्जतीचा छळ केल्याचे लोक सांगत आहेत. त्याचबरोबर आपलेसे केलेल्या चार “उपभोग्या”ना हाताशी धरून, त्यांच्याशी 50 टक्याची भागीदारी करून “इच्छा तशी व्यवस्था” असा “पेशा” सुरू केल्याचे नागरिक दबक्या आवाजात बोलत असल्याचे समजते.
“असुर”बाळासो” नामकाने काचेचे भांड्याला तडा घालवण्यासाठी केलेल्या छळाविरुद्ध एका पती-पत्नीने आत्महत्या करण्याचा प्रयत्न केल्याचे सर्वज्ञात असल्याचे समजते. त्याचबरोबर नरवाड येथील एका नातेवाईकांने घेतलेले पंधरा हजार रुपये देण्यासाठी उशीर झाला म्हणून, या “ब्लॅक डायमंड” पड नामकाने “त्या” नातेवाईकांच्या घरातील सर्व भांडीकुंडी, गॅस टाकी, शेगडी, इतर साहित्य टीव्ही असा संसार भरून आणल्याची आजही चर्चा होत असल्याचे समजते.
गणेशवाडी सारख्या लहान गावाने मोठे पाठबळ दिले. याचा फायदा उठवत “असूूर”बाळासो” नामकाने “माण” मिळवत अनेक “गावे” गिळंकृत केल्याची चर्चा आहे. व्याज मागणीसाठी “असूर”बाळसो” नामकाची एन्ट्री होणार म्हटले की, आजही परिसर, घरामध्ये मालकासह इतरांना “नो एन्ट्री” अशा कायद्याची दहशत असल्याचे लोक बोलत असल्याची चर्चा आहे.
खाजगी सावकारी,उंबरठ्याच्या आतील इज्जतीचा छळ, उपभोग्या पेशा, दहशत अशा जुलमी कार्यपध्दतीचा बिमोड करण्यासाठी जिल्हा पोलिस अधिक्षक, उपविभागिय पोलिस अधिकारी ठोस पावले उचलावीत अशी मागणी पिडीतातून होत असल्याचे समजते.