“तांबे-पितळ” धातूला चकाकी देण्यासाठी, गावभागातील “पौर्णिमा” चंद्राला सुपारी, “दहा” लाख मोलाने केले “भिकारी”
आत्मसन्मानाची विक्री, करून चकाकीचा “पुरावा” नष्ट करण्यासाठी केला जबरदस्त प्रयत्न, पण निराश “अप”यश”ने “पौर्णिमा”चा चंद्रच केला फस्त.
इचलकरंजी : खमक्या वृत्तसेवा
उभे आडवे धागे विणणाऱ्या गावभागात एक “पौर्णिमा”चा चंद्र उगवला. रात्रीच्या अंधारात अवकाशातून आपले पांढरे शुभ्र “तेज” फेकून “तांबे-पितळ” सारख्या “गंज” चढलेल्या धातूला काळ्याकुट्ट अंधारात चमकवण्याचा बेत रचला. “दहा” लाखमोलाची सुपारी घेवून आत्मसन्मान विकला ?, अशी कथा इचलकरंजी शहरात चर्चेत आली आहे.
“पौर्णिमा”चे तेज महत्त्वाचे ? की, दहा लाखाचे मोल महत्त्वाचे ? की, “तांबे-पितळ” महत्वाचे ? “श्रद्धा” नेमकी कशावर ठेवायची ? या विवंचनेचा निष्कर्ष “दहा” लाखमोलाच्या सुपारीवर येऊन थांबला, आणि इथेच “पौर्णिमा”च्या चंद्राचा अस्त सुरू झाला.
“गंज” चढलेल्या “तांबे-पितळ” धातूच्या वस्तूला झळाळी देण्याच्या नादात “पोर्णिमा”च्या चंद्राने “यश” “अपयश”चा विचार न करता, थेट “यश”लाच मूठ माती देवून, गाव भागात “यादवी” माजवण्याच्या निर्णय घेतला, आणि हाच निर्णय “पौर्णिमा”च्या चंद्राचा बळी घेणारा ठरला.
“पौर्णिमा”च्या चंद्राने अंगाखांद्यावरील “स्टार” पासून “तेज” निर्माण करणाऱ्या वस्त्रातून भीतीचे साम्राज्य निर्माण करून, बाजी मारण्यासाठी “दहा” लाखमोलाच्या सुपारीतुन चकाकी, झळाळीचा “पुरावा” नष्ट करण्याचा जबरदस्त प्रयत्न केला. “अशोक” चक्र सोडण्याची धमकीही दिली. या चाकलुसीकडे यश आणि अपयशाचे बारिक लक्ष होते. निराश “यश”ने अपयशाच्या चिंदड्या करीत डाव उधळून लावला.
“गंज” चढलेल्या “तांबे-पितळ”ला चकाकी आणण्यासाठी अल्प आयुष्य घेऊन जन्माला आलेली “श्रद्धा” टिकवण्याकरीता “पौर्णिमा”च्या चंद्राने “दहा” लाख मोलासाठी आपल्या “आत्मसन्मान”ची विक्री केली, अपयशाची पाठराखन करीत “यश”चा बळी घेतला, गाव भागातील सर्व “स्टार”ना रात्रीत विझवले.
बघता बघता ही माहिती गाव भागात पोहोचली. “गंज” चढलेल्या “तांबे-पितळे” सारख्या धातूला चकाकी देण्यासाठी “पौर्णिमा”च्या चंद्राने पत्करलेली “लाचारी” चर्चेत आली. “श्रद्धा”ला बळ देण्याकरीता फोडलेली सुपारी तोंडात आली.