मोठमोठ्या जाहिराती, दिशाभूल करणे अशा अकॅडमीवर केंद्र सरकारची शिक्षण समिती कारवाई करणार, माध्यमिक व जुनिअर कॉलेज शिक्षण संस्थांची ही चौकशी होणार.
इचलकरंजीतील “त्या” वादग्रस्त अकॅडमीच्या समावेश ? केंद्रीय उच्च शिक्षण समितीचे सचिव विनीत जोशी यांच्या अध्यक्षतेखाली होणार कारवाई.
इचलकरंजी : खमक्या वृत्तसेवा
विना परवाना, खाजगीरित्या, बेकायदेशीरपणे चालवल्या जाणाऱ्या अकॅडमीकडून मोठ-मोठ्या जाहिरातींचा झगमगाट करून विद्यार्थी व पालकांची दिशाभूल करण्यात येत आहे. अशा अकॅडमीवर कायमस्वरूपी निर्बंध आणण्यासाठी केंद्र सरकारने महत्त्वपूर्ण पाऊल उचलले आहे.
बाहेरील विद्यार्थी विकत घेऊन तो आपल्या अकॅडमीचा आहे असे दाखवून, दिशाभूल करून लाखो रुपये उकळणाऱ्या अकॅडमीला आता लगाम बसणार आहे.
अकॅडमीमध्ये होणाऱ्या शारीरिक, मानसिक व शैक्षणिक छळांमुळे विद्यार्थ्यांची आत्महत्या होत आहे. मोठ्या प्रमाणात पैसे उकळले जात आहेत. काही अकॅडमीचे वादग्रस्त कामकाज यासह अन्य बाबी केंद्र सरकारच्या लक्षात आल्यामुळे सरकारने अकॅडमीच्या उधळणाऱ्या घोड्याला ओझ्याचे गाढव करण्याचा निर्णय घेतला आहे.
केंद्र सरकारच्या यादीवरील वादग्रस्त अकॅडमी मध्ये इचलकरंजी येथील, शाळा माध्यमिक शाळा व जुनिअर कॉलेज तसेच “त्या” वादग्रस्त अकॅडमीच्या नावांचा समावेश असल्याचे समजते.
याशिवाय अकॅडमीला विद्यार्थी पुरवणाऱ्या माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण संस्थांची चौकशी करण्यात येणार आहे. ज्या माध्यमिक शाळा, कॉलेज विद्यार्थ्याला अकॅडमी मध्ये शिक्षण घेण्यासाठी प्रोत्साहित करीत आहेत अशा शिक्षण संस्थांवर कायमस्वरूपी बंदी घालण्यात येणार असल्याचे समजते.
खाजगी, विनापरवाना अकॅडमीचे फॅड कमी करण्यासाठी केंद्रीय शिक्षण मंत्रालयाने 11 जणांची समिती गठित करून कारवाईला सुरुवात केली आहे. केंद्रीय उच्च शिक्षण सचिव विनीत जोशी यांच्या अध्यक्षतेखाली अकॅडमीची पाळेमुळे खोदण्याचे कामकाज होत आहे.
केंद्र सरकारने स्थापन केलेल्या समितीने प्रत्येक वर्षी अकॅडमी आणि महाविद्यालय कॉलेज संदर्भातील अहवाल केंद्रीय उच्च शिक्षण सचिव यांच्याकडे सादर करण्याचा आहे.समितीमध्ये सीबीएसईचे अध्यक्ष, आयआयटी मद्रास, आयआयटी कानपूर, एनआयटी त्रिची आणि एनसीईआरटीचे प्रतिनिधी यांचा समावेश आहे.