जयसिंगपुरातील “विक्रमसिंह” मैदान परिसरातून, दुसऱ्या ठिकाणी घालवणारा अजून जन्माला यायचा आहे, आता “अध्यक्ष” पद असल्यामुळे “घेईल तो निर्णय” आणि “करेल तो कायदा” माझाच असणार. असे सांग त्या “खेळकर”, “अनिलराव” यांना. अशी “ताठर भाषा” वापरणाऱ्या “टग्या”परश्या”ला, “अनिलराव” यांनी अक्षरशः माती चारुन चांगलीच जिरवल्याची चर्चा “विक्रमसिंह” मैदान परिसरात रंगल्याचे समजते.
“लाख” मोलाची “माया” गिळायला सोकावलेल्या “टग्या”परश्या”ने, पराभवाची भीती खाऊन, “शेपूट” घातल्याची चर्चा आहे.”परश्या”ने स्वतःकडे ठेवलेली “2.75 लाख” मोलाची आणि “अनिलराव” यांना देण्यास काढून ठेवलेली “25 हजार” मोलाची “माया” अशी एकूण “3 लाख” मोलाची “माया” परत घ्या, असे बोलून जमिनीवर नाक घासू लागल्याचे “विक्रमसिंह” मैदान परिसरातील लोक बोलत असल्याचे समजते.
“अनिलराव” यांनी जाड पुट्ट्यावरील कागदांना “उब” देण्याचा घेतलेला निर्णय “सार्थ” ठरला. “तीन लाख” मोलाची “माया” “टग्या”परश्या”ला “घशात” घालून दिली नाही. मोठे “मन” करून, स्वतः वाट्याला येणारी “25 हजार” मोलाची माया न घेता, उलट ती “माया” संबंधिताकडे परत पाठवण्याचे “सत्कर्म” करून “खेळकर” वृत्ती दाखवल्याची चर्चा शिरोळ पोलिस ठाणे व न.प.पाणी पुरवठा विभाग परिसरात सुरू असल्याचे लोक बोलत आहेत.
जयसिंगपूर शहर परिसर व “विक्रमसिंह” मैदानावरील मातीचा “वास” लागलेल्या “टग्या”परश्या”ने गोरगरीब, नागरिक, शेतकरी, बिल्डर, ठेकेदार, यांची लूट करून मिळवलेल्या माये तून, “स्वप्न” बाळगलेल्या”नगरी”त कोठ्यावधी रुपयांचा “महल” बांधायला सुरुवात केली आहे. दोन वर्षात “परश्या”कडे एवढी “माया” आली कुठून हा देखील प्रश्न डोकीला “झिन-झिन्या” आणणारा असल्याचे लोक बोलत आहेत.