“भा”, “ग”ची बहीण व “शाली”, “ग”ची बायको आणि “छैया”, माझी मैत्रीण अशी ओळख करून दिली ; पिडीत महिला
मुंबई/शिरोळ/उमरगा : खमक्या वृत्तसेवा
भावी पीएसआय आणि पूर्वीचे मुंबई क्राईम ब्रँचचे प्रमुख अधिकारी तसेच नुकतेच बलात्कार प्रकरणी अटक होऊन 28 दिवसानंतर जामिनावर बाहेर पडलेले निखिलदादा खाडेसाहेब यांनी शिरोळ मधील एकाला चार लाखाचा गंडा घालण्याचा प्रयत्न केल्याच्या माहितीची चर्चा आहे.
महाराष्ट्रात कुठे कुठे पोलीस भरती सुरू आहे, कोणाकोणाची निवड होणार आहे, याची अंतर्गत माहिती काढून, ज्या त्या गावात जाऊन, मी तुमच्या मुलाची पोलीस भरतीचे काम करून देतो, अधिकारी माझ्या ओळखीचे आहेत, मला “चार लाख” रुपये द्या, असे बोलून शिरोळ मधील एका पोलीस भरती होणाऱ्या मुलाच्या कुटुंबाला दिवसा “चांदणे” दाखवण्याचा प्रयत्न खाडे सरांनी केल्याचे बोलले जात आहे.
पोलीस भरती होणाऱ्या मुलाचे आई-वडील आणि त्याचे अन्य कुटुंबीय अत्यंत हुशार आणि चाणक्ष, चतूर असल्यामुळे त्यांनी खाडेचा फसवा रंग ओळखला, खाडे याच्या फसवेगिरीच्या घटनेला उजाळा देत, खाडे सर तुम्ही निघा, आम्ही बघतो असे सांगून हाकलून काढल्याचे समजते.
बलात्कार पीडित महिला, माझ्यासह मैत्रिणींना मुंबई मेट्रो मध्ये नोकरी लावतो असे सांगून “पंधरा लाखाचा” गंडा घातल्याचे म्हटले आहे. खाडे सरांचा काहीतरी काळाबाजार आहे, असे लक्षात आल्यानंतर पीडित महिलेने पैशाची रसद पुरवण्याचे बंद केले. त्यानंतर खाडे सरांचा पारा आकाशाला जाऊन भिडला, घाणेरड्या शिवीगाळ सुरू केल्याचे सांगते.
यापूर्वी खाडे सरांनी, “भा”, “ग”ची बहीण आहे. आणि “शाली”, “ग”ची बायको आहे. तसेच “छैया”, माझी मैत्रीण आहे. अशी ओळख करून दिलेल्या महिलाकडून मोबाईल चॅटिंग माध्यमातून दबाव वाढवायला सुरुवात केली. पैसे मिळत नाहीत, शोभा, प्रतिष्ठा कमी होणार, याचा पक्का विचार करून खाडे साहेबांनी स्कॅन्डल साखळी, टोळीचा वापर केल्याचे पीडिताने सांगितले.
नोकरी नाही, पैसे नाहीत, अब्रूचे खोबरे झाल्याच्या चिंतेने डिप्रेशनमध्ये गेल्याचे ओळखून निखिल खाडे सरांनी दि. 9 डिसेंबर 2024 रोजी “भा”, “छैया”, “शाली” आणि “श्रीधर” यांना उमरगा येथे घेवून येवून 50 हजार रुपयांची खंडणी वसूल केल्याची माहिती पीडित महिलेने “खमक्या”शी बोलताना दिली.