मी मरणाच्या तडकिवर गेलो तरी, तुझी आठवण काढणार नाही. तुझ्यामुळे माझ्या उभ्या आयुष्याची, माझ्याच डोळ्यासमोर वाट लागली.
मला वाटत होते तू, लई इब्रतीचा आहेस. पण तो माझा गैरसमज होता, हे मला कळून चुकले आहे. चांगली कपडे घातली, पायात चांगले बूट चप्पल घातले, दाढी मिश्या वाढवून गावात डार डूर करीत रुबाब दाखवला म्हणजे सगळं होत नसतं. मन निर्मळ असावं लागतं, चांगलं असावं लागतं, बुद्धी चांगली असावी लागते, तुझ्यासारखं भ्रष्ट नसावं हे मला चांगलंच समजून आल आहे.
आज मला जिल्ह्यातील वरिष्ठांनी सक्तीने घरात बसवले आहे. आणि हे सगळं तुझ्यामुळे झाल आहे. तुझं का म्हणून ऐकलो, माझी बुद्धी कुठे शेण खायला गेली होती, हेच मला कळायला तयार नाही. तुला गावाचा कचरा, घाण पुरली नाही. तिथे तू माझे काय संरक्षण करणार, हे मी त्याच वेळी ओळखायला पाहिजे होतं.
मित्रा, काही संबंध नसताना दोन वर्षात तू कोट्यावधी रुपयांची लूटमार केलास, अगोदर किती लुटमार केला असशील हे मला माहित नाही. गावाचा कचरा, घाण गोळा करणाऱ्या कामगारांचा पगार सुद्धा तुला पुरला नाही. तुझी ही लाचार, स्वार्थी बुद्धी मी त्याच वेळी ओळखायला पाहिजे होती. पण, तुझ्या विश्वासावर जो कोणी नोकरी करेल त्याने भिकच मागायची. हे मात्र पक्क झाल आहे.
तू ,तुझ्या स्वार्थासाठी मला मागासवर्गीय, गरिबांची बांधकामे पाडायला लावलास. तुला जगण्यासाठी मी साधन निर्माण करून दिले. सध्या, येणाऱ्या भाड्यातून तू किराणा मालाचा बाजार भरून, घरात उपजीविका करत आहेस. तुझ्या सांगण्यामुळे मी अनेकांच्या जमिनी अडकवून टाकल्या.बेकायदेशीर रित्या तुला नारळ फोडायचा अधिकार दिला. कमिशनमध्ये 35 एकर जमीन घेऊन दिली,
पण, कुत्र्यासारखी तुझी शेपूट वाकडी ती वाकडीच राहणार ! त्यामुळे तुझ्या नादाला लागण्यात अर्थ नाही. तू एक दिवस सगळ्या गावाला डबऱ्यात घालणार, गावाचा पैसा लुटणार. पण, जाता जाता तुला एक गोष्ट सांगतो, माझ्या वाट्याला जे दुःख आले आहे, त्याच्यापेक्षा भयंकर दुःख तुझ्या वाट्याला येईल.
सध्या, तुझ्या घरात काय चाललंय ते मला समजलय, देव तुला माफ करणार नाही. तुझी राजकीय, सामाजिक, प्रतिष्ठित अशी सगळी वसुली लवकरच होणार “32 हजार बुडव्या”. या शंका नाही. ही काय करतात शेंबडी, मेकडी पोरं अस तू ज्यांना म्हणत होतास, पण,त्यांनीच तासून गाठीची खुंटी मारल्या बघ.