भुयारी गटर कोणाच्या फायद्याची ?, शिरोळला गरज आहे का ?, जादा कराचा बुर्दंड कुणाला ? पैसा तुमचा चैनी आमची ?
भुयारी गटारीचे सर्व अधिकार मुख्याधिकारी यांना, नागरीकांची सतर्कता महत्वाची, प्रत्येक वर्षाला प्रत्येक मिळकत धारकाला भरावे लागणार जादा 1,200 रुपये ?
शिरोळ : खमक्या वृत्तसेवा
शिरोळ शहरातील भुयारी गटारीचे काम, वर्क ऑर्डरवर येऊन थांबले आहे. एकदा काम सुरू झाले की, प्रत्येक मिळकत धारकाला या भुयारी गटारीचा बाराशे रुपये अधिभार भरावा लागणार असल्याची चर्चा आहे. म्हणजे घरफाळा, पाणीपट्टी बरोबर भुयारी गटारीचा शासकीय कर बंधनकारक होणार.पर्यास्त प्रत्येक मिळकत धारकाच्या शासकीय करामध्ये वाढ होणार असल्याचे समजते.
भुयारी गटारीचे काम सुरू करण्यापूर्वी पहिल्यांदा सांडपाणी व मल निस्सारण प्रकल्पाची उभारणी करणे बंधनकारक आहे. त्यामुळे नागरिकांनी भुयारी गटारीची आवश्यकता असेल तर . डोळे उघडे ठेवून कामकाजावर लक्ष ठेवण्याची गरज असल्याचे बोलले जात आहे.
सध्या, ज्या ज्या ठिकाणी भुयारी गटारीची कामे सुरू आहेत. त्या त्या ठिकाणची परिस्थिती पाहिली तर ही योजना नागरिकांसाठी आहे की ? अन्य कोणासाठी आहे ? हा प्रश्न डोळ्यासमोर उभा राहिल्याशिवाय राहणार नसल्याचे नागरिक बोलत आहेत.
भुयारी गटारीचे एकूण बजेट आणि होणारे काम पावसाळ्याच्या तोंडावर केले तर, “बाप तो बाप गेला अन् ……… हातही गेला” असे म्हणण्याची वेळ नागरिकांवर येईल असे लोक बोलत आहेत.
भुयारी गटारीचे कामकाज झाल्यानंतर, जुन्या गटारी बंद करून प्रत्येक मिळकत धारकाला त्याच्या घरातील सांडपाणी व मलपाणी भुयारी गटारीला जोडण्यासाठी जबरदस्ती केली जाणार असल्याचे समजते. नळ कनेक्शन प्रमाणे एकदा का, भुयारी गटारीला सांडपाण्याचे कनेक्शन जोडले तर प्रत्येक वर्षाला त्याचा अधिभार वसूल केला जाणार असल्याचे कळते.
सध्या, भुयारी गटारी वरून शहरात सुरू असलेल्या चर्चेनुसार भुयारी गटार झाली तर, रस्ते उखडून टाकले जाणार आहेत, चांगल्या रस्त्याची गटारीची धूळधाण केली जाणार आहे, पावसाळ्यात तर गावात घसरगुंडीचा खेळ खेळावा लागणार आहे.
गावाला भुयारी गटारीची आवश्यकता नसताना भुयारी गटारीचा हट्टाहास कोण आणि कशासाठी करीत आहे. याचा सारासार विचार करून नागरिकांनी वर्क ऑर्डर होण्यापूर्वी विचार करण्याची आवश्यकता असल्याची नागरिक बोलत आहेत. भुयारी गटार करायची की, नाही. याचे सर्व अधिकार मुख्याधिकारी यांना देण्यात आले आहेत. नागरिकांनी विरोध केल्यास भुयारी गटारीचे काम थांबू शकते अशी चर्चा आहे.