शिरोळच्या अस्मितेला “नख” लावण्याचा प्रयत्न केल्यास “राधव-माजेंद्र”रावची जिथे, सत्ता असेल तिथे सुरुंग लावायला शिरोळकर मागेपुढे पाहणार नसल्याची चर्चा !
शिरोळ/जयसिंगपूर : खमक्या वृतसेवा
मुख्याधिकारी “निशिकांत प्रचंडराव” यांना सक्तीच्या रजेवर पाठवण्याचा जिल्हास्तरावरील निर्णय आणि “पृथ्वीराजसिंह यादव” यांच्या आंदोलनाला आलेल्या यशामुळे काही मंडळींच्या नाकाला मिरच्या झोंबल्याची चर्चा शिरोळ, जयसिंगपूर, कुरुंदवाड शहराबरोबर, परिसरात सुरू आहे.
प्रचंडराव सक्तीच्या रजेवर या “खमक्या”तील वृत्तानंतर शुक्रवारी रात्री जयसिंगपूर शहरात “राधव-माजेंद्र”राव दोन कारखानदारांची गोपनीय बैठक पार पडली. यामध्ये पृथ्वीराजसिंह यादव यांचे आंदोलन, मोडीत काढा. लागेल तेवढा पैसा पुरवतो. अशी विनंती राधवने, माजेंद्ररावाला केल्याची माहिती समजून येत आहे.
“बुडव्या”ची ताकद कमी झाली आहे, खूप बदनामी होत आहे, नागरिकात नाराजी आहे. मी त्या ठिकाणी उतरलो किंवा गेलो तर, मला उत्तर द्यावे लागेल. “बुडव्या”ने घाण, केली म्हणजे आम्ही त्यात आलोच. त्यामुळे मला या प्रक्रियेत प्रत्यक्षात भाग घेता येत नाही. त्यामुळे तुम्ही पुढाकार घेवून आंदोलन मोडून काढा, असा जोर दिल्याची चर्चा आहे.
याशिवाय आगामी निवडणुकीत शिरोळमध्ये “राधव-माजेंद्र”राव असे “एकत्रित पॅनल” करून यादव पॅनेलचा सुपडासाप करण्याची जबाबदारी माजेंद्र तुम्ही घ्या, नेतृत्व करा. “बुडव्या”ला पुढे केले तर, निश्चित पराभव होणार. त्यामुळे तुम्ही शिरोळात लक्ष घाला, मी इथली निवडणुक बघतो.अशीही चर्चा झाल्याची, चर्चा आहे.
बाहेरच्या गावात व शहरात राहणाऱ्यांनी शिरोळ शहरावर हुकूमत ठेवण्याचा डाव टाकल्याचे “राधव-माजेंद्र”रावांच्या बैठकीवरून दिसून येत असल्याची चर्चा आहे. पण, शिरोळकर सुद्धा “गप्प” बसतील असे नाही, शिरोळच्या अस्मितेला “नख” लावण्याचा प्रयत्न केल्यास “राधव-माजेंद्र”रावांची जिथे, सत्ता असेल अशा प्रत्येक संस्थेत सुरुंग लावायला शिरोळकर मागेपुढे पाहणार नसल्याचीही चर्चा रंगली आहे.
मिळालेल्या माहिती नुसार “पृथ्वीराजसिंह यादव” यांच्या आंदोलनामुळे अनेक कामातील “भ्रष्टाचार”, “अनियमितता”, “काळाबाजार” बाहेर पडणार आहे. भल्याभल्यांना रात्रीबरोबर दिवसाही “डोस” घ्यावा लागणार आहे. पायाखालची वाळू घसरली आहे, त्यामुळेच आंदोलन मोडण्यासाठी बैठकीचे आयोजन करण्यात आले असावे अशी चर्चा असल्याचे समजते.