बिहार मधून आणलेल्या गावठी बनावटीच्या रिवाल्वर अजूनही तालुक्यातच असल्याची चर्चा !
अमली पदार्थ आणि अवैध धंद्यामधून टोळी युद्ध भडकल्यानंतरच पोलीस कारवाई करणार काय ?
जयसिंगपूर/शिरोळ/कुरुंदवाड : खमक्या वृत्तसेवा
“त्या” बियर बार मधील एका बिहारी वेटरच्या माध्यमातून शिरोळ तालुक्यात गावठी बनावटीची “रिवाल्वर” आणि “तलवार” यासह इतर घातक हत्यारे आणल्याच्या चर्चेच्या अनुषंगाने पोलिसांनी तपासाची सूत्रे गतिमान केल्याचे दिसून येत नसल्याची चर्चा आहे.
बिहारी वेटरने पोत्यातून मागवून घेतलेली घातक हत्यारे आजही शिरोळ तालुक्यातच असून ती कोणत्या गुप्त ठिकाणी ठेवण्यात आली आहेत याची माहिती वेटर आणि त्याच्या एका मित्राला असल्याचे समजते.
कार्यक्षेत्रातील पोलिसांनी त्या बियर बार मधील बिहारी वेटरला पुन्हा ताब्यात घेऊन कसून चौकशी केल्यास घातक हत्यारे कोणाच्या घरी लपवून ठेवली आहेत, याचा सुगावा लागू शकतो, कोणते कांड करण्यासाठी ही हत्यारे मागवण्यात आली आहेत. याचाही उलगडा होईल अशी चर्चा आहे.
“खमक्या” मधील वृत्तानंतर तालुक्यात गावठी बनावटीच्या “रिवाल्वर” संदर्भात अजूनही दबक्या आवाजात चर्चा सुरू आहे. घातक हत्यार बाबत वेटर आणि त्याच्या संबंधितांनी सुरक्षितेच्या दृष्टीने प्रचंड गोपनीयता पाळल्याचे चर्चेतून समजून येत आहे.
वास्तविक पाहता, पोलिसांनी यापूर्वी गावठी बनावटीच्या रिवाल्वर बाबतीत त्या वेटरच्या खोलीची झाडाझडती घेतली होती ?. त्यामुळे पोलिसांना वेटर कोण आहे ? याची माहिती असावी असेही बोलले जात आहे. गावठी बनावटीच्या रिवाल्वरमुळे अगंतूक कोणतीतरी अनुचित घटना घडण्यापूर्वी पोलिसांनी या प्रकाराचा पर्धापाश करावा अशी मागणी होत आहे.
गांजा ,अफीम, नशेच्या टॅबलेट-इंजेक्शन या अमली पदार्थांबरोबर गावठी दारू, पत्त्याच्या पानाचा जुगार, मटका, कॅसिनो अशा अवैध्य व्यवसायातील स्पर्धामुळे गुन्हेगारीत वाढ होत चालल्याचे चित्र दिसत आहे. अशा बेकायदा, अघोरी आणि टोळी युद्ध घडवणाऱ्या घटनांचा वेळीच नायनाट करणे आवश्यक आहे अन्यथा……..