
खंडपीठाला शेंडा पार्क किंवा कृषी महाविद्यालय येथील जागा दिली जाईल ; आमदार अमल महाडिक.
खंडपीठाचे खरे यश कोल्हापूर जिल्ह्यातील विविध वकील बार असोसिएशनचेच, श्रेयाचा मुद्दा उपस्थित करण्याच्या तयारीत असणाऱ्यांना चपराक ?
कोल्हापूर : खमक्या वृत्तसेवा
कोल्हापूर जिल्ह्यातील सर्व वकील बार असोसिएशनच्या वतीने करण्यात आलेल्या खंडपीठाच्या मागणीला यश आले आहे. सर्वोच्च न्यायालयाचे न्यायाधीश भूषण गवई यांनी मागणीची दखल घेण्याबरोबर एकूण कामकाजाचा आढावा घेऊन नुकतेच मुंबई येथून कोल्हापूरला खंडपीठ होणार असल्याची माहिती दिली.
वार्ताहरांना देशोधडीला लावण्यासाठी कोणत्याही निच थराला ? : https://khamkyanews.in/?p=662
मे.न्यायाधीश भूषण गवई यांच्या माहितीनंतर कोल्हापुरात खंडपीठ करण्याच्या दृष्टीने हालचाली गतिमान करण्यात आल्या आहेत. या पार्श्वभूमीवर भाजपाचे आमदार अमल महाडिक यांनी एका बैठकीत खंडपीठाची मागणी मान्य झाली असून शासनाची लवकरच अधिसूचना निघणार असल्याचे स्पष्ट केले आहे.
पोलीस तपासात बनावट व्हाउचर : https://khamkyanews.in/?p=677

खंडपीठाला शेंडा पार्क किंवा कृषी महाविद्यालय येथील जागा दिली जाईल. यासंदर्भातही येत्या दोन आठवड्यात निर्णय होईल, असेही महाडिक यांनी सांगितले. खंडपीठ स्थापनेमुळे अनेक पक्षकारांचे मुंबई, औरंगाबाद न्यायालयातील हेलपाटे, आर्थीक बुर्दंड, वेळ वाचणार आहे. तसेच खंडपीठाचे संपुर्ण कामकाज मुंबई उच्य न्यायालयाच्या धर्तीवर चालणार आहे.
“त्या” कायदे पंडिताला न्याय व्यवस्थेचे चक्रव्यूह भेदने इतके सहज वाटते काय ? : https://khamkyanews.in/?p=762
कोल्हापूर येथे मुंबई उच्च न्यायालयाचे खंडपीठ व्हावे याकरिता कोल्हापूर जिल्ह्यातील सर्व वकील बार असोसिएशनच्या वतीने जोरदार ताकद लावण्यात आली होती. धरणे आंदोलने करून मोर्चे काढण्यात आले होते. अखेर वकिलांच्या या मागणीची सर्वोच्च न्यायालयाचे न्यायाधीश भूषण गवई यांनी दखल घेतली.
आंदोलन अंकुशने भ्रष्टाचाऱ्यांना तुरुंगाची हवा दाखवावी : https://khamkyanews.in/?p=764
दरम्यान, खंडपीठाच्या मागणीला यश आल्याचे स्पष्ट करून, श्रेय वादासारख्या मुद्याने नाक वर काढण्यापूर्वी आमदार अमल महाडिक यांनी सर्वोच्च न्यायालय आणि शासनाला समोर ठेवून दिलेली माहिती जनहितार्थ ठरल्याची चर्चा कोल्हापूर जिल्ह्यात सुरू आहे.
शिरोळचा बिहार होण्याची वाट पाहिजे का ? : https://khamkyanews.in/?p=775

