“प्रधान” होण्याची स्वप्न पूर्ण करण्यासाठी “तो” कर्मचारी विस्तवावरून चालण्यास उतावीळ झाल्याची चर्चा.
“प्रधान” पदाची जबाबदारी पार पाडण्यासाठी “हातपायाने” मजबूत रहावे म्हणून, त्याने आत्तापासूनच “गुडघ्याला” बाशिंग बांधले ?
शिरोळ : खमक्या वृत्तसेवा
येथील नगरपरिषदेमध्ये कार्यरत असणाऱ्या एकूण कर्मचाऱ्यांपैकी एक कर्मचारी “इस्त्रीलंपट” असल्याची चर्चा आहे. त्याची कामकाज पद्धती म्हणजे हा बैल मुझे मार अशा स्वरूपाची असून तो स्वतःला “जिल्हाधिकारी” समजतो असेही बोलले जात असल्याचे समजते.
सध्या, या “इस्त्रीलंपट” महाभागाने नगरपरिषद विभागाकडे काम करणाऱ्या कर्मचारी “पंत” प्रतिनिधींचा “प्रधान” होण्याची स्वप्ने उराशी बाळगली आहेत, ही स्वप्ने पूर्ण करण्यासाठी त्याने आपल्या लंपटगिरीची “पत्ते” फेकायला सुरुवात केली असल्याचे चर्चेत आहे.
कर्मचारी “पंत” प्रतिनिधींचा “प्रधान” होण्यासाठी “त्या” महाभागाकडून केल्या जाणाऱ्या खेळीवर शिरोळकरांबरोबर काही कर्मचाऱ्यांनी कटाक्ष नजर ठेवली असल्याचे समजते.
शिरोळ नगरपरिषदेचा सध्यस्थितीतील पाणीपुरवठा, नवीन अमृत पाणी योजना, “32 हजार” बुडव्याच्या भ्रष्टाचाराचा बहुचर्चित घनकचरा ठेका, घरफाळा, पाणीपट्टीतील लाखो रुपयांची तफावत, भ्रष्टाचार प्रकरणी दोन कर्मचाऱ्यांवर गुन्हे दाखल व निलंबन, नवीन पाणी योजनेला परस्पर पैसे घेऊन दिलेले नळ कनेक्शन, नवीन होणारी भुयारी गटार,
मागासवर्गीय कर्मचाऱ्यांना दिली जाणारी दुजाभावाची वागणूक, शिपाई कर्मचाऱ्यांची केली जाणारी पिळवणूक, अशा वेगवेगळ्या कारणातून नगरपरिषदेचा कारभार महाराष्ट्रात पोहोचला आहे. तत्कालीन मुख्याधिकारी प्रचंडराव यांच्यासारख्या मुरब्बी जाणकार आणि चतुर अधिकाऱ्याची पाणी पिताना “पॅन्ट ओली” झाली या घटना अजून ताज्या आहेत.
या घटनांचे गांभीर्य विचारात न घेता कर्मचारी “पंत”प्रतिनिधींचा “प्रधान” होण्याची स्वप्ने पाहणाऱ्या त्या महाभागाने मी काहीही करू शकतो, अशा ठेवलेल्या “ओव्हर कॉन्फिडन्स”ला यश येणार की, “अपयश”, की स्वप्न “धुळीस” मिळणार यावर सध्या, कर्मचाऱ्यांच्यात चर्चेचे रणकंदन सुरू असल्याचे कळते.
कर्मचारी “पंत” प्रतिनिधींचा “प्रधान” होण्याची स्वप्ने उराशी बाळगून कार्यरत असणाऱ्या “इस्त्रीलंपट” कर्मचाऱ्याला नगरपरिषद प्रभारी मुख्याधिकारी, जिल्हा सह आयुक्त, आणि जिल्हाधिकारी यांनी “प्रधान” बनण्याची स्वप्ने सोडून देण्याची समज द्यावी. अशी मागणी नगरपरिषद कर्मचारी वर्तुळातून केली जात असल्याचे समजते.