मानसन्मान, श्रेय, प्रमुखाजवळ स्थान पाहिजे पण, बेंबीच्या देठाला कळ नको.
कोल्हापूर : खमक्या वृत्तसेवा
दि. 17 ऑगस्ट रोजी कोल्हापूर येथे सर्वोच्च न्यायालयाचे सरन्यायाधीश भूषण गवई साहेब यांच्या हस्ते सर्किट बँकेचे उद्घाटन होणार आहे. या उद्घाटनाचे औचित्य साधून विविध पक्ष सामाजिक संघटना यांनी लावलेले फलक संविधानिक दृष्ट्या उचित नसल्याच्या कारणातून ते उतरवण्यास भाग पाडल्याची खळबळ जनक माहिती, सोशल मीडियावरील एका वृत्त वाहिनीच्या माध्यमातून पुढे आली आहे. या घटनेनंतर व्यासपीठावर खुर्ची व स्थान मिळवून स्वतःचा सत्कार करून घेण्यासाठी फडफडणाऱ्यांना ही मोठी चपराक आहे.
वास्तविक पाहता, सर्किट बेंच उद्घाटन सोहळा हा न्यायालय आणि सरकार यांच्या संबंधित आहे. कोल्हापूरकरांच्या मागणीची पूर्तता सरन्यायाधीश भूषण गवई साहेब यांनी केली आहे. त्यामुळे पक्ष, संघटना वा “श्रेय” घेण्याचा प्रयत्न करणाऱ्यांचा याच्याशी दुरान्वये सुद्धा सबंध येत नाही. तसेच न्यायालय आणि सरकारच्या संबंधित व्यक्तींशिवाय व्यासपीठावर इतरांना स्थान मिळणार नसल्याचे या घटनेतून अधोरेखित झाले आहे. त्यामुळे कोल्हापूर जिल्हा व सत्र न्यायालयाचे न्यायाधीश आणि जिल्हाधिकारी यांच्याकडून अधिक लक्ष केंद्रित केले जाईल अशी अपेक्षा व्यक्त होत आहे.
दरम्यान, “खमक्या”ने यासंदर्भात वेगवेगळ्या आशयाचे वृत्त प्रसिद्ध करून, आवाज उठवत असंबंध आणि श्रेय घेण्यास आसूसलेल्या व्यक्तींना व्यासपीठावर स्थान देण्यात येऊ नये, अशी लोक भावना मांडली आहे. त्याचबरोबर “सर्व संपादकांना व्यासपीठावर स्थान मिळावे”, “25 वर्षाच्या संघर्षाचे अपयश कोणाचे ?”, “खंडपीठासाठी उपोषण करण्याची तळमळ असावी लागते” अशी वृत्त मालिका प्रसिद्ध करून संविधानिकता जागृत करण्याचे काम केले.
सध्या, सर्किट बेंच उद्घाटन सोहळ्याच्या व्यासपीठावर खुर्ची मिळवण्यासाठी काहींकडून वेगवेगळी शक्कल लढवली जात आहे, श्रेय पदरात पाडून घेण्याचा प्रयत्न होत आहे. परंतू सरन्यायाधीश भूषण गवई साहेब, मुंबई उच्च न्यायालयाचे चीफ जस्टीस अलोक आराध्ये साहेब, महाराष्ट्र राज्यपाल महोदय, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसजी यांच्याकडून लोक भावनेचा आदर केला जाणार आहे, त्यामुळे न्यायव्यवस्थेचा गैरवापर करणाऱ्या व्यक्तींना व्यासपीठावर स्थान देण्यात येऊ नये. अशा लोकभावनेच्या अनुषंगाने जिल्हाधिकारी अमोल येडगे साहेब, संविधानिक दृष्ट्या “संविधानाचा” अवलंब करतील यात शंका नाही.
अशीही लोक भावना
सर्किट बेंच उद्घाटनात सत्कार व्हावा, श्रेय मिळावे अशी अपेक्षा करणाऱ्या मतलबी व्यक्तींचा, ज्यांना आदर करावा असे वाटते. त्यांनी, न्यायालय आणि सरकारच्या प्रोटोकॉलचा आदर ठेवणे आवश्यक आहे. त्यांनी, त्यांच्या खाजगी जागेत, संस्था, कार्यालय, ऑफिस, सभागृह येथे जाऊन शुभेच्छा द्याव्यात. न्यायालय आणि सरकारशी संबंध नसणाऱ्यांचा, उगाच संबंध जोडू नये, अशी लोक भावना आहे.