कर्नाटकच्या मुकेश व उमेश गणपती गोसावी उर्फ जाधव या दोघा सख्या भावांना दाखवला तुरूंगाचा रस्ता !
सराईत दोघा सख्या भावावर पश्चिम महाराष्ट्रातील वेगवेगळ्या पोलीस ठाण्यात वेगवेगळ्या गुन्ह्यांतर्गत 29 गुन्हे दाखल.
जयसिंगपूर : खमक्या वृत्तसेवा
चिपरी (ता.शिरोळ) येथील बेघर वसाहतीमधील आर.जी. ट्रेडर्स स्क्रॅप मर्चेंट दुकानात झालेल्या चोरीचा, जयसिंगपूर पोलिसांनी केवळ आठ तासात छडा लावून चोरटे मुकेश व उमेश गणपती गोसावी उर्फ जाधव (रा. बदर गल्ली, पिरानवाडी ता. खानापुर जि. बेळगाव रा. कर्नाटक) या दोघा सख्या भावांना कॉपर तारेच्या 3 लाख 30 हजार रुपयांच्या मुद्देमाला सहित जेरबंद केले. चोरी प्रकरणी राजू लक्ष्मण गोसावी यांनी जयसिंगपूर पोलिसात फिर्याद दिली होती.
दाखल गुन्हयातील चोरीस गेलेली मोटर सायकल व चोरटे जयसिंगपुर एम.आय.डी.सी येथील आकीवाटे इंडस्ट्रीज परीसरात, कॉपर धातुचा माल भरलेली चारचाकी वाहन घेवुन येणार असलेची खात्रीशीर बाातमी पोलिसांना मिळाली होती त्यानुसार पोलिसांनी सापळा रचून संशयितरित्या बसलेल्या दोघा जणांकडे चौकशी केली. संशय बळवल्यानंतर पंचासमक्ष संशितांच्या ताब्यात असलेले चारचाकी वाहनाची (वॅगनर MH-02-AK-3188 ) मागील दरवाजा उघडुन पाहीले असता गाडीमधील सीट आडव्या पाडुन त्यावर कॉपर धातुचे अंदाजे 225 किलो वजनाचे वेगवेगळे कॉपर तारा एकत्र करुन तयार केलेले बंडल आढळून आले.
अधिक चौकशी केली असता चोरट्यांनी कॉपर धातु तार ही चिपरी बेघर वसाहत मधील आर.जी. ट्रेडर्स स्क्रॅप मर्चटचे दुकानातुन पत्रा कट करुन चोरी केल्याची कबुली दिली. सदसचे चोरटे सराईत रेकॉर्डवरील आरोपी असुन,आरोपीकडुन आणखीन गुन्हे उघडकीस येण्याची शक्यता आहे.
मुकेश गणपती गोसावी उर्फ जाधव याचेवर कुपवाड पोलीस ठाणे सांगली येथे तीन, विश्रामबाग पोलीस ठाणे सांगली, शिरोळ पोलीस ठाणे येथे पाच,शिरोली एमआयडीसी पोलीस ठाणे, हातकणंगले पोलीस ठाणे, शिवाजीनगर पोलीस ठाणे,मुरगुड पोलीस ठाणे, अलीबाग पोलीस ठाणे रायगड,खालापुर पोलीस ठाणे रायगड येथे पाच गुन्हे दाखल आहेत. तर उमेश गणपती गोसावी उर्फ जाधव याचेवर कुपवाड पोलीस ठाणे सांगली येथे दोन,विश्रामबाग पोलीस ठाणे सांगली येथे दोन, मुरगुड पोलीस ठाणे,शिरोली एमआयडीसी पोलीस ठाणे,कुरुंदवाड पोलीस ठाणे, अलीबाग पोलीस ठाणे रायगड,खालापुर पोलीस ठाणे रायगड येथे दोन गुन्हे दाखल आहेत.