फसवणूक, खंडणी व चॅटिंग आणि स्टॅंडल प्रकरणात नाव येवू नये म्हणून “सखी”ने खाडेला 20 हजार दिले ; पीडित महिला
लुबाडणुक, फसवणूक व अमिष दाखवून बलात्कार करणे, घाणेरडे आरोप करणे, गंडा घालने, थापा मारणे, खोटे बोलणे असा खाडेचा धंदा ; पीडित महिला
उमरगा/लातूर/घालवाड : खमक्या वृत्तसेवा
पीएसआय, पोलिस आहे, क्राईम ब्रँचचा प्रमुख अधिकारी आहे, मेट्रो रेल्वे विभागात माझा दबदबा आहे असे खोटे बोलून लोकांना फसवून, त्यांची लुबाडणुक करणाऱ्या बलात्कार गुन्ह्यातील संशयित आरोपी निखिल खाडे याच्याकडे वारंवार पैसे मागताना, त्याने, तिथे पैसे अडकले आहेत. ते, काढण्यासाठी एवढा खर्च आहे, असे सांगून जादा 5 लाख रुपयेला लुबाडल्याची असल्याची माहिती बलात्कार पीडित महिलेने “खमक्या”शी बोलताना दिली.
लोकांची फसवणूक आणि लुबाडणूक करून लाचार, भिकाऱ्यासारखे दुसऱ्याच्या दारोदारी भटकून आयुष्य जगणाऱ्या संशयित आरोपी खाडे याला घामाचे जीवन माहिती नाही, स्वतःच्या टोळीतील “सखी” नामक महिलेला, तुझे या प्रकरणातून नाव काढतो, असे सांगून 20 हजाराची भीक घेतल्याचे सांगून, पीडित महिलेने, संबंधित महिलेने कोणत्या आधारावर पैसे दिले असाही सवाल केला.
संबंधित महिलेचा फसवणूक, खंडणी व चॅटिंग आणि स्टॅंडल प्रकरणात किती खोलवर पाय रुतला आहे. याचा उलगडा होऊ नये म्हणून जुळवाजुळव व झाकाझाकी करण्याचा केविलवाना प्रयत्न करून आर्थिक व्यवहाराच्या नावावर इतरांना बदनाम करण्याचा प्रयत्न भावी पीएसआय व संशयित आरोपी खाडे याच्याकडून केला जात असल्याचे पीडित महिलेने सांगितले.
मुंबई क्राईम ब्रँचचे प्रमुख अधिकारी म्हणून कार्यरत असल्याचे सांगणारा संशयित आरोपी खाडे याला परिसरातील महिलांनी रिक्षातून येऊन त्याच्याच गावात अंगावरील कपडे फाटेपर्यंत मारल्याची घटना आजही ताजी आहे. याशिवाय गतवर्षी मुंबईमध्ये वास्तव्य करणाऱ्या केरळमधील नागरिकांनी मार-मारून संशयित आरोपी खाडे यास अंधेरी मधील सरकारी इस्पितळात उपचारासाठी दाखल केला होता. याची सर्व पातळीवर आजही चर्चा असल्याचे पीडित महिलेने बोलताना नमूद केले.
जामीन घेताना ज्याने, आपल्याच वकिलाची दोन लाखाची फसवणूक केली, अशा भावी पीएसआय व बलात्कारातील संशयित आरोपी निखिल खाडे याच्या अनैतिकता कृत्याची सर्वांना माहीती आहे. लुबाडणुक, फसवणूक करणे, गंडा घालणे, अमिष दाखवून बलात्कार करणे, खोटे बोलणे, थापा मारणे, दुसऱ्यावर घाणेरडे आरोप करणे असा त्याचा नेहमीचा धंदा बनला आहे, याला दुसऱ्यांनी बळी पडू नये असे आवाहन पीडित महिलेने केले आहे.